Thursday, July 5, 2012

कर्मवीर भाऊराव पाटील,रयत शिक्षण संस्था सातारा,स्थापना,पुरस्कार,जन्म rayat shikshan sanstha ,karmawir bhaurao patil

 -  कर्मवीर भाऊराव पाटील   -

जन्म - रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म
           सप्टेंबर २२, इ.स. १८८७  रोजी कोल्हापूर
           जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला.
           
मूळ गाव - ऐतवडे बुद्रुक

प्राथमिक शिक्षण - सांगली जिल्ह्यातील "विटा" या गावी झाले.
                          पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये
                          दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये
                          करण्यात आली.
 रयत शिक्षण संस्थेची स्थापना  :-

कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले.. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.
दिनांक ४ ऑक्टोबर, १९१९ रोजी कर्मवीरांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली.पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले

पुढील काळात ते सातार्‍यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मद्वान्नामास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदी मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. सातार्‍यात त्यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले.२५ फेब्रुवारी, १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली.

१६ जून, १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था रजिस्टर झाली. याच साली सातार्‍यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.
भाऊरावांनी देशातलं ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वानुसार चालणारे पहिले ‘फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’.
 १९४७  -     सातार्‍यात छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना
 १९५४  -     कर्‍हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना
 १९५५        प्रशिक्षित शिक्षकांच्या कमतरतेमुळे महात्मा फुले अध्यापक              
                  विद्यालयाची स्थापना
 १९५५        सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावानं ‘आझाद कॉलेज ऑफ
                  एज्युकेशन’ सुरू केले.

पुरस्कार  :-
महाराष्टाच्या जनतेने त्यांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. १९५९ साली त्यांना पुणे विद्यापीठाकडून ‘डी.लिट्’ पदवी बहाल करण्यात आली. भारत सरकारनेही ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. श्री. ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे.


 मृत्यू :-




               ९ मे, १९५९.
 सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृती भवन - यांच्या माध्यमातून कर्मवीरांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत.